हरभजन सिंगचा ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठीचा अर्ज ‘फेटाळला’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याचा खेलरत्न पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. हरभजन सिंगचे नाव पंजाब सरकारच्या क्रीडा विभागाने ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी पाठवले होते. अर्ज फेटाळल्यामुळे हरभजन सिंगने सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे. हरभजन सिंगने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हरभजन सिंगने व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने म्हटले की, २० मार्च रोजी सर्व कागदपत्रांसह अर्ज पंजाब सरकारला पाठविला होता, तरीही तो अर्ज फेटाळला गेला. उशीरा अर्ज पाठविल्यामुळे असे घडल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत पंजाब सरकारने अर्ज पाठविण्यात कुठे उशीर केला आहे याची चौकशी करावी अशी मागणी हरभजन सिंगने केली आहे. तसेच मी अर्ज वेळेवर पाठवला होता असे देखील हरभजन म्हणत आहे.

 

पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोधी म्हणाले की, पंजाबच्या क्रीडा मंत्रालयाने हरभजन सिंग यांचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठविले होते. पण केंद्राने त्याला नकार दिला आहे. राणा गुरमीत म्हणाले की, “अर्ज का फेटाळण्यात आला याची आम्ही चौकशी करणार आहोत”. केंद्र सरकारने फाईल उशिरा पाठवल्याचे म्हटले आहे पण मला असे वाटत नाही. पंजाब सरकारने फाईल वेळेवरच पाठवली होती. मंत्र्याने म्हटले की, अनेक वेळा खेळाडूला उशिरा जाग येते. नेमकी कोठे चूक झाली याचा तपास आम्ही करणार आहोत. जर कोणत्या अधिकाऱ्याची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

व्हिडिओमध्ये हरभजनच्या वेदना स्पष्ट्पणे दिसून येत आहेत. हरभजन म्हणतोय की, खेलरत्न मिळणे ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. या वेळी हरभजनला खेलरत्न मिळेल याची खात्री होती. पण पंजाब सरकारने फाईल वेळेत केंद्र सरकारकडे पाठवली नाही म्हणून त्याचा अर्ज फेटाळण्यात आला असा आरोप हरभजनसिंगने पंजाब सरकारवर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like