भाजप नेत्या जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  प्रसिद्ध बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि एसपी नेता आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप नेत्या जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. रामपूरचे एडीजे 6 च्या न्यायालयानं हो वॉरंट जारी केलं आहे.

आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदाविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 एप्रिल 2020 रोजी होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जयाप्रदा यांच्याविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणं दाखल झाली होती. स्वार कोतवालीमध्ये दाखल झालेल्या खटल्याप्रकरणी कोर्टानं हे वॉरंट जारी केलं आहे.

जयाच्या वकिलाचा युक्तीवाद
याआधीही केमरी ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणी कोर्टनं जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 मार्च 2020 रोजी होणार आहे. जयाप्रदाचे वकिल मुस्तफा हुसैन यांच्यानुसार, त्यांना स्वार प्रकरणाची माहितीच नव्हती. कारण पोलीसांनी आगाऊ तपासणी करताना आचार संहितेचं उल्लंघन नव्हतं मानलं. त्यांनी सांगितलं की, ते पुढील सुनावणीत आपली बाजू मांडतील.