फसवणूक प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरींविरूध्द ‘अजामीनपात्र’ वॉरंट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याविरोधात तेलंगणामधील खम्मम येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एका प्रकरणात त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहायचे होते. मात्र त्यांनी या प्रकरणी न्यायालयात हजेरी न लावल्यानंतर त्यांच्या विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. रेणुका यांच्यावर एक गुन्हेगारी खटला दाखल असून या विषयी त्यांना हे वॉरंट बजावण्यात आले आहे.

काय आहे आरोप

रेणुका चौधरी यांच्यावर भुकिया राम चंद्र यांच्या पत्नी बी कलावती यांनी खटला दाखल केला आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे कि, त्यांनी भुकिया राम चंद्र यांना वायरा विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी चौधरी यांना 1 कोटी 20 लाख रुपये देखील दिले होते. मात्र त्यांना तिकीट न दिले गेल्याने त्यांनी आपले पैसे परत मागितले. मात्र रेणुका चौधरी यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. त्यानंतर भुकिया राम चंद्र हे कोमामध्ये गेले आणि यामुळे ऑक्टोंबर 2014 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर देखील चौधरी यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर भुकिया राम चंद्र यांच्या पत्नी कलावती यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र चौधरी यांनी कोर्टाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रेणुका चौधरी यांना खम्मम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी त्यांना 168062 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

आरोग्यविषयक वृत्त –