काँग्रेसचा आगामी अध्यक्ष ‘गैर गांधी’ : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत, अनेक तर्कविर्क लावले जात आहेत. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहतील कि नाही याबाबत अनिश्चितता आहे. अशात पक्षाचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

त्यांनी म्हटले कि गांधी परिवाराबाहेरील म्हणजेच ‘गैर गांधी’ व्यक्ती पार्टीचा प्रमुख होऊ शकतो परंतु पक्षसंघटनेमध्ये गांधी परिवार सक्रिय असणे गरजेचे आहे. त्यांनी दावा केला कि भाजप चे लक्ष्य ‘गांधी मुक्त काँग्रेस’ हे आहे म्हणजे पुढे जाऊन त्यांचे ‘काँग्रेस मुक्त भारत’ चे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे भाजप याचीच वाट पाहत आहे. .

अय्यर यांनी म्हटले कि जर राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले तर सर्वात चांगले होईल मात्र त्यांचा नकार असेल तर त्यांच्या इच्छेचा देखील मान राखला जावा. याशिवाय गांधी नेहरू कुटुंबातील अध्यक्ष नसेल तरी काँग्रेस चे अस्तित्व कायम राहील आणि कामकाज चालू शकेल मात्र नेहरू-गांधी कुटुंबाने पक्षात सक्रिय रहावे आणि जेथे गंभीर मतभेद उत्पन्न होतील अशा वेळी मध्यस्थी करून योग्य मार्ग काढावा.

राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे अशी पक्षातील नेत्यांची मागणी :

अय्यर यांनी म्हटले कि राहुल यांनी अध्यक्षपदासाठी पर्याय शोधण्यासाठी एक महीन्याचा वेळ दिला आहे आणि या मुद्द्यावरून पक्षात चर्चा आणि विचारविनिमय चालू आहे. जास्तीत जास्त लोकांचे असेच म्हणणे आहे कि राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे. अध्यक्षपदी राहुल राहतील कि अजून दुसरा कोणता पर्याय पक्ष शोधून काढेल याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत माध्यमांनी वाट पाहावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना आपल्या अनुभवाचं दाखल देत त्यांनी असेही म्हटले कि मला नाही वाटत कि हा विषय केवळ एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातील निर्णय आहे, हा संपूर्ण पक्षावर प्रभाव पडणारा महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. भाजप मात्र या मुद्द्याचे राजकारण करत आहे कारण भाजप चे लक्ष्य ‘गांधी मुक्त काँग्रेस’ हे आहे म्हणजे पुढे जाऊन त्यांचे ‘काँग्रेस मुक्त भारत’ चे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. असे असताना ‘जर तुम्ही मुंडकेच उडवले तर शरीर तडफडणारच’ असे वक्तव्य त्यांनी या मुद्द्यासंदर्भात संदर्भात केले.

याआधीही होते गैर गांधी अध्यक्ष :
अय्यर यांनी नेहरू-गांधी परिवाराबाहेरील लोक पक्षाचे अध्यक्ष राहिल्याची इतिहासातील काही उदाहरणेही सांगितली. यू एन ढेबर यांच्यापासून तर ब्रह्मानंद रेड्डी यांच्यापर्यंत माजी अध्यक्षांची नावे त्यांनी यावेळी सांगितली. याबद्दल माहिती देताना सांगितले कि आता गतकाळातील हे मॉडेल वापरता येऊ शकेल. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर चालू असणाऱ्या चर्चेच्या संदर्भात बोलताना त्यांनी पार्टी यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करेल तोपर्यंत प्रसारमाध्यमांनी वाट पहावी असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त

रक्त शुद्धीकरणासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

सतत तणाग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

You might also like