Covid-19 : घरात राहून ‘रिकव्हर’ होणार्‍या कोरोना रूग्णांसाठी आली दिलासादायक बातमी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. मात्र, अनेक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये सुद्धा बरे होत आहेत. नवीन स्टडीत हॉस्पिटलमध्ये दाखल न होणार्‍या या रूग्णांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. मेडिकल जर्नल द लँसेटच्या स्टडीत दावा करण्यात आला आहे की, कोविड-19 चे जे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत नाहीत, त्यांच्यात या व्हायरसचा लाँग टर्म इफेक्ट कमी होतो.

स्टडीत म्हटले आहे की, हॉस्पिटलमध्ये दाखल न होणार्‍या कोरोनाच्या रूग्णांमध्ये गंभीर दीर्घकालिन प्रभावाचा धोका कमी होतो, मात्र त्यांना वारंवार कोणत्या ना कोणत्या इन्फेक्शनसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासते.

स्टडीत म्हटले आहे की, सार्स-कोव्ह-2 ने संक्रमित झाल्यानंतर ज्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासत नाही, त्यांच्यात कोरोनातून बरे झाल्यानंतर होणार्‍या गंभीर धोक्यांची शक्यता खुप कमी असते. मात्र, हे लोक कोविड-19 शी संबंधीत कोणत्या ना कोणत्या समस्येसाठी हॉस्पिटलच्या फेर्‍या मारतच असतात.

स्टडीनुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल न होणार्‍या रूग्णांमध्ये पुढे गंभीर धोका होत नसला तरी त्यांच्यात काही दिवसानंतर थ्रोम्बोएम्बोलिज्मची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचे अनेक रूग्ण बरे झाल्यानंतर 2 आठवडे ते 6 महिन्यानंतर पर्यंत ब्रोन्कोडायलेटर थेरेपीच्या आवश्यकतेपासून डिस्पनिया पर्यंतच्या तक्रारी घेऊन परत हॉस्पिटलमध्ये येत आहेत.

होम आयसोलेशनमध्ये बरे झाल्यानंतर सुद्धा व्हायरस शरीरात कोणते ना कोणते लक्षण सोडून जातो. कोरोना रूग्णांवर या आजाराचा परिणाम मोठ्या कालावधीपर्यंत राहतो. या रूग्णांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक आजार, हृदयाचे आजार, डायबिटीजची तक्रार आणि कमजोरीची लक्षणे दिसून येत आहेत.