खुषखबर ! सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त, ६२.५० रुपयांची कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. अनुदानीत गॅस सिलेंडरची किंमत तब्बल ६२.५० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्याने त्याचा थेट फायदा ग्राहकांना करुन देण्यासाठी कंपन्यांनी या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विना अनुदानीत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आता ५७४.५० रुपये झाली आहे. नवे दर बुधवारी रात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात विनाअनुदानीत एलपीजी सिलेंडरच्या किंमती १००.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

या दोन्ही महिन्यात मिळून एकूण विना अनुदानीत सिलेंडरची किंमत १६३ रुपयांची कमी झाली आहे. विना अनुदानीत सिलेंडरची किंमत कमी केल्याने त्याचा थेट फायदा व्यावसायिकांना प्रामुख्याने होणार आहे. तसेच घरगुती वापर करणाऱ्या सर्वसामान्यांना आता १४.२ किलोचा अनुदानीत सिलेंडर आता ५७४.५० रुपयांना मिळणार आहे. जुलै मध्ये त्यासाठी ६३७ रुपये द्यावे लगत होते.

इंधन कंपन्या दर महिन्यांच्या एक तारखेला बाजारभाव लक्षात घेऊन गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. मागील दोन महिन्यात विना अनुदानीत गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –