विना-अनुदानित ‘घरगुती’ गॅस सिलेंडर ‘महागला’, जाणून घ्या आता कितीला मिळणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी विना-अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत 15.50 रुपयांनी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईट नुसार, राजधानी दिल्लीमध्ये आज विना-अनुदानित 14.2 किलोग्रामचा घरगुती गॅस सिलेंडर 590 रुपयांना मिळणार आहे.

ऑगस्टमध्ये त्याची किंमत 574.50 रुपये होती. सलग 2 महिने गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या होत्या आता त्यामध्ये वाढ झाली आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीत विना-अनुदानित गॅस सिलेंडर 601 रुपया ऐवजी 616.50 रुपयांना मिळणार आहे तर मुंबईमध्ये आता गॅस सिलेंडर 546.50 ऐवजी 562 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये 590.50 ऐवजी गॅस सिलेंडर आता 606.50 रुपयांना मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –