25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील महिन्यात पश्चिम अफ्रीकेतील मालीतील हलीमा ( Halima ) नावाच्या महिलेची डिलिव्हरी संपूर्ण जगात चर्चेचा विषय झाली होती. 25 वर्षीय हलीमा ( Halima ) नावाच्या या महिलेने एकाच वेळी नऊ मुलांना जन्म दिला होता. डिलिव्हरीमध्ये काही अडचणी असल्याने तेथील सरकारकडून महिलेला मोरक्कोमध्ये उपचाराची विशेष व्यवस्था केली होती. जन्मानंतर मुलांची स्थिती सुद्धा नाजूक होती. मात्र, आता वृत्त आहे की, सर्व बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मात्र, ही 9 बालके आजूनही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

मोरक्कोच्या या हॉस्पिटलने न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की,
4 मे रोजी मालीच्या एका महिलेने ज्या नऊ मुलांना जन्म दिला, त्यांची प्रकृती चांगली होत आहे परंतु दोन महिने अजूनही देखरेखीत ठेवण्याची आवश्यकता आहे.

ऐन बोरजा क्लिनिकचे प्रवक्ते अब्देलकोद्दस हाफसी यांनी म्हटले की, ही बालके आता कोणत्याही वैद्यकीय उपकारणाशिवास श्वास घेत आहेत. ती श्वास घेण्याच्या समस्येतून बाहेर पडली आहेत.

हाफसी यांनी सांगितले की, बालकांना ट्यूबद्वारे दूध दिले जात आहे आणि त्यांचे वजन आता वाढून 800 ग्रॅम आणि 1.4 किलोग्रॅमच्या दरम्यान झाले आहे. या 9 बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलगे आहेत. बाळांची आई त्यांच्याजवळच राहत आहे.

हाफसी यांनी म्हटले, या बाळांना कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय जीवन सुरू करण्यास अजून दिड महिना लागेल. 10 डॉक्टर आणि 25 नर्सेसच्या मेडिकल टीमने ऑपरेशनद्वारे ही डिलिव्हरी केली होती.

मालीच्या सरकारने 30 मार्चला चांगल्या देखभालीसाठी हलीमाला मोरक्कोला पाठवले होते. सुरुवातीला अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये हलीमाच्या पोटात सात बाळं असल्याची बाब समोर आली होती परंतु डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टरांना समजले की, ही सात नव्हे, तर नऊ बालके आहेत.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

Corona Third Wave : नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला

120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस ! ‘या’ कारणामुळे पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ पोलीस तडकाफडकी निलंबित

5 जून राशीफळ : आज सौभाग्य योग, 6 राशींची चांदी, होईल भरपुर लाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार

मोठी कारवाई ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ