Video : बँकॉकच्या रस्त्यावर चक्क कपडे विकत होती नोरा फतेही ! प्रचंड व्हायरल झाला होता व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये दिसत असल्यानं चर्चेत येत आहे. नुकतीच ती टेरेंस लुईस सोबतच्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली होती. नोरा तशीही आपल्या डान्स व्हिडीओमुळं कायमच चर्चेत असते. त्यामुळं चर्चेत येण्याची ही तिची काही पहिलीच वेळ नाही. नोरा आधीही एका व्हिडीओमुळं चर्चेत आली होती ज्यात नोरा कपडे विकताना दिसली होती.

https://youtu.be/rVgxlctgfpY

काही दिवसांपूर्वी नोराचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नोरा कपडे विकताना दिसत होती. बँकॉकमधील एका लोकल मार्केटमध्ये नोर कपडे विकत असल्याचं म्हटलं जात होतं. व्हिडीओत तिच्या आजूबाजूला कपड्यांचे ढीगही दिसत होते. एक पँट हातात घेत सातशे, आठशे, दोनशेमध्ये कपडे घ्या असं ती म्हणत होती.

व्हिडीओत नोरा खूप आनंदी दिसत होती. इतकंच नाही तर एका ग्राहकासोबत ते बार्गेनिंग करताना दिसत होती. परंतु नोराचा हा व्हिडीओ असाच मस्ती करतानाचा होता. मित्र मैत्रिणींसोबत ती जरा मस्ती करत होती. तिचं हे वेगळं रूप पाहून अनेक चाहतेही हैराण झाले होते. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला होता.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत.