Nora Fatehi | पुन्हा एकदा नोराच्या डान्सने घातला धुमाकूळ; वाढदिवसानिमित्त केला बेली डान्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | मुळची कॅनडाची असलेली अभिनेत्री डान्सर नोरा फतेही हिने बॉलिवूड मध्ये आपल्या डान्सने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नोराने आपल्या डान्सने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. आज नोराचे जगभरात अनेक चाहते आहेत. नुकताच पार पडलेल्या फिफा विश्वचषकात देखील तिने डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पुन्हा एकदा नोराचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Nora Fatehi)

 

सध्या नोरा तिचा 31 वा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करत आहे. ती आपल्या मित्रमंडळींबरोबर वाढदिवस साजरा करत आहे. सध्या नोरा एका यॉटवर आपला वाढदिवस साजरा केल्याचे दिसत आहे. यावेळी तिने मनापासून नृत्य करत केक कापला आहे. यावेळी नोराने बेली डान्स केला आहे. तर तिने फ्लोरल प्रिंटेड को-ऑर्डर ड्रेस परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Nora Fatehi)

 

सोशल मीडियावर नोराचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की “मुंबईत नाचायचे पैसे घेतेस दुबईमध्ये फुकट नाचतेस”. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले “वा छान नृत्य करतेस”. तर एका युजरने तिला थेट सुकेश वरून कमेंट केले आहे. यावेळी या नेटकऱ्याने म्हटले की, “नीट बघ मागून सुकेश जहाज घेऊन यायचा” अशा एक ना अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. तर नोराच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

Web Title :- Nora Fatehi | actress nora fatehi celebrating her birthday at dubai with friends

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर