Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन : छोट्या पडद्यावर अनेक बहुचर्चित शोज आहेत त्यापैकीच एक म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show). या शोमध्ये अनेक कलाकार आणि दिग्गज मंडळी उपस्थित राहून अनेक मुद्द्यांवर चर्चा करत असतात आणि त्यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगत असतात. गेल्याच भागामध्ये अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने (Nora Fatehi) कपिल शर्माच्या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने खूप धमाल केली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी अशा गोष्टींचाही खुलासा तिने केला जो ऐकल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला.

या कार्यक्रमात गप्पा चालत असतानाच कपिल ( Kapil Sharma) ने नोराला (Nora Fatehi) विचारले की, “चित्रीकरण दरम्यान कधी कोणाशी तुझं भांडण झालं होतं का?” या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत नोराने तिचा किस्सा सगळ्यांसमोर सांगितला.

नोरा (Nora Fatehi) म्हणाली, “बांगलादेशमध्ये (Bangladesh) मी चित्रीकरण करत असताना माझ्या सहकलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केल्याने मी कोणताच विचार न करता त्याच्या कानाखाली मारली.
यानंतर त्यांनी देखील माझ्या कानशिलात लगावली.
मग मीही त्याला पुन्हा कानाखाली मारले त्यानंतर तो माझे केस खेचू लागला आमचे भांडण चालू असताना
शेवटी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या वादामध्ये हस्तक्षेप करावा लागला”.
नोराने सांगितलेला हा किस्सा ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या तर अनेकांना धक्काही बसला.

Web Title :- Nora Fatehi | actress nora fatehi slapped her co star during film shoot in in bangladesh see details

Pune Police | पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली