Video : नोरा फतेहीने लावले लावणीवर ठुमके !

नवी दिल्ली : अभिनेत्री नोरा फतेही चांगलीच प्रसिद्ध आहे. नोरा सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असते. नोरा फतेही प्रत्येक फॅन्ससोबत आपली माहिती शेअर करत असते. नोरा सध्या शो ‘डान्स दिवाने’मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. तिने ठुमके हाय गर्मी या गाण्यावर डान्स केला.

नोराचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती लावणीवर डान्स करताना दिसत आहे. नोराचा हा व्हिडिओ टीव्ही कलर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा आपल्या डान्सचा जलवा दाखवताना दिसते. व्हिडिओमध्ये स्टेजवर एक स्पर्धक लावणी करताना दिसत आहे. स्पर्धकाला पाहून नोरा खूप उत्साहित दिसत आहे. त्यानंतर नोरा फतेही स्टेजवर जाऊन लोकप्रिय गाणे ‘हाय गर्मी’वर लावणी करताना दिसत आहे. तिच्या एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नोराचा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘नोराला लावणी करताना पाहायचे आहे? तर पाहा सूचना आणि नोराचा स्टेजवर आग लावणारा परफॉर्मन्स केवळ डान्स दिवाने 3 वर.’ अभिनेत्रीचा हा व्हिडिओ फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. नोरासोबत मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट मार्स पेड्रोजो हे देखील दिसत आहेत.