…म्हणून नोरा फतेहीला सोडावा लागला India’s Best Dancer शो, गीता कपूरही झाली ‘भावूक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री आणि इंडियाज बेस्ट डान्सर शोची जज मलायका अरोराला कोरोनाची लागण झाल्यानंतर इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये नोरा फतेही हिची एन्ट्री झाली होती. नोराची एन्ट्री झाल्यानंतर तिच्या लोकप्रियतेमुळं शोचा टीआरपी काही दिवसातच वाढल्याचं दिसून आलं. परंतु नोराला आता हा शो सोडावा लागला आहे. कारण आता मलायका कोरोनातून बरी झाली असून ती कमबॅक करत आहे. नोराला शो सोडावा लागत असल्यानं या शोची दुसरी जज गीता कपूर इमोशनल झाली आहे.

View this post on Instagram

U came like a breath of fresh air and have left us gasping for more !!! Thank u my baby Nora for being such a lovely and special part of my life … I don’t know how u did it but in such a short span u filled an important space left by @malaikaaroraofficial with such grace… dignity.. gud vibe … love and honesty … and u leave us with so much too hold on too …I will miss u lil gurl and I’m sure I say this on behalf of all those u come across and go ur way YOU ARE RATCHET … ur vibe is infectious… god bless u may success be ur best friend and stay with u always … love u Nora PRA PRA PRA PRA PRRRRRRRRAAAAA Must watch this week as @norafatehi spends her last weekend on #indiasbestdancer @sonytvofficial @terence_here @bharti.laughterqueen @haarshlimbachiyaa30 @framesproductioncompany @tranjeet

A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial) on

गीतानं तिच्या इंस्टावरून पोस्टही शेअर केली आहे. नोराचा फोटो शेअर करत तिनं भलामोठा मेसेज लिहिला आहे. गीतानं लिहिलं की, “तू शोमध्ये एखाद्या ताज्या हवेच्या झुळुकेप्रमाणे आलीस. माझ्या लाईफचा एवढा छान पार्ट होण्यासाठी धन्यवाद बेबी नोरा. मला नाही माहित की, तू हे कसं केलं. पण इतक्या कमी वेळात तू तुझी इमानदारीनं, प्रेमानं सभ्यतेनं एक खास जागा निर्माण केली, जी मलायकाच्या जाण्यानं रिकामी झाली होती. मला तुझी खूप आठवण येईल. देवाचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहिल.”

गीताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गीताचे काही चाहतेही ही पोस्ट पाहून इमोशनल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट करत आपल्या भावन्या व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

Classy, bougie, ratchet ✨🧸

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

View this post on Instagram

🍓🍓

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on