Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | फुटबॉल विश्वातील मोठी स्पर्धा ‘फिफा वर्ल्ड कप’ सध्या कतारमध्ये सुरू आहे. या फिफा विश्वचषक २०२२ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सध्या अशाच एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नोराच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Nora Fatehi)
‘गरमी’, ‘ओ साकी साकी’ गाण्यांमधून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नोराने फिफा वर्ल्ड कपच्या फॅनफेस्ट इव्हेंटमध्येही डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन केले. नोराने तिच्या तालावर चाहत्यांनाही ठेका धरायला भाग पाडले. आपला डान्स सादर केल्यानंतर नोराने मंचावर भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला. यानंतर तिने राष्ट्रध्वज फडकावत असताना ‘जय हिंद’ अशा घोषणाही दिल्या. नोराचा फिफा वर्ल्ड कपमधील हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Nora Fatehi)
या “फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा सहभाग नाही. परंतु, आपली गाणी व डान्सद्वारे आपण इथे उपस्थित आहोत”, असे ती यावेळी म्हणाली. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Web Title :- Nora Fatehi | nora fatehi waves indian nation flag in fifa world cup 2022 fanfest event video viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत
Jack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप