‘स्ट्रगलच्या काळात माझ्यासोबत झाले असे काही’ : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा खुलासा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नोरा फतेहीने सत्यमेव जयते या सिनेमात दिलबर गाण्यावर आयटम नंबर केला होता. हा आयटम नंबर हिट झाल्यानंतर नोराच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. लवकरच ती आता बाटला हाऊस या सिनेमात साकी साकी या गाण्यावर आयटम नंबर करताना दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांसून ती या गाण्यामुळे चर्चेत आहे. याशिवाय नोराने साऊथच्या सिनेमातील अनेक गाण्यावर आपला जलवा दाखवला आहे. रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन या सिनेमातून नोराने आपला बॉलिवूड डेब्यू केला होता.

नोराचं ग्लॅमर जरी आपल्याला दिसत असलं तरी तिचा प्रवास मात्र तितका सोपा नव्हता. नोराच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात लोक तिला कशी वागणूक द्यायचे हे नोराने अनेकदा अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आपल्या स्ट्रगलबद्दल सांगताना नोरा म्हणाली की, “कास्टींग एजंट मला अजिबात चांगली वागणूक देत नव्हते. माझ्या तोंडावर ते माझी खिल्ली उडवत असत.”

पुढे बोलताना नोरा म्हणाली की, “तेव्हा मी हिंदी शिकायला सुरुवात केली होती परंतु यासाठी माझी मानसिक तयारी मात्र झाली नव्हती. लोक माझी खिल्ली उडवायचे म्हणून मी रस्त्यातून रडत जायचे. एका कास्टींग एजंटने तर मला माझ्या देशात परत जाण्यास सांगितले होते. ही गोष्ट तर मी कधीच विसरू शकत नाही.”

तसं पाहिलं तर नोरा फतेही आयटम नंबरसाठी ओळखली जाते. नोरालाही प्रेक्षकांमधील आपली ही इमेज बदलायची आहे नोरा म्हणते की, “एक प्रोजेक्ट माझी इमेज बदलू शकत नाही. यावर्षी माझ्याकडे काही प्रोजेक्ट असे आहेत ज्यामध्ये मी प्रेक्षकांना डान्स आणि म्युझिकपेक्षा वेगळे काहीतरी करताना दिसणार आहे.”

 

आरोग्यविषयक वृत्त –