नोरा फतेहीचे ‘रॉयल’ फोटो सोशलवर व्हायरल ! चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशलवरून शेअर करत असते. जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटोंमुळे आणि व्हिडिओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोरा आपल्या काही फोटोंमुळं सोशलवर चर्चेत आली आहे.

नोरानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात नोरा खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. नोरानं फोटो शुट केलेले काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. यात नोराचा लुक पाहण्यासारखा आहे. चाहत्यांनाही तिचा हा रॉयल लुक खूपच भावला आहे.

फोटोंमध्ये नोरा ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तर तिच्या गाण्यातील शब्दांचा वापर करत हाये गरमी म्हणत कमेंट केली आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.