Nora Fatehi | नोरा फतेहीच्या आरोपांवर सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक मोठा खुलासा; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन : Nora Fatehi | सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांची देखील चौकशी केली जात आहे. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. त्या बदल्यात तो नोराला आलिशान जीवनशैली आणि मोठा बंगला देणार होता. आता नोरा फतेहीच्या या वक्तव्यावर सुकेश चंद्रशेखरने त्यांच्या वकिलांमार्फत पत्र लिहून त्यात नोरा फतेहीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. “मी तिला घर देणार असल्याचं वचन दिल्याचं नोराने सांगितलं आहे. पण, तिने माझ्याकडून आधीच घरासाठी मोठी रक्कम घेतली आहे. मोरोक्कोमधील कासाब्लांका येथे घर खरेदी करण्यासाठी नोराने माझ्याकडून आधीच खूप मोठी रक्कम घेतली होती.

9 महिन्यांपूर्वी ईडीला दिलेल्या जबाबानंतर कायद्यापासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी तिने सर्व नवीन
कथा रचल्या आहेत,” सर्व नवीन आणि जुन्या प्रकरणांवर बोलताना सुकेशने सांगितलं कि,
‘नोराने तिला कार नको होती, हा जो दावा केला आहे तो ही खोटा आहे. कारण तिने माझ्यामागे कार
बदलण्यासाठी सारखा तगादा लावला होता. तिच्याकडे महागडी गाडी नव्हती, म्हणून मी तिला तिच्या
आवडीची बीएमडब्ल्यू एस सीरीज कार दिली. ती परदेशी नागरिक असल्याने ती गाडी तिने तिच्या मैत्रिणीचा
नवरा बॉबी याच्या नावावर गाडीची नोंदणी करण्यास सांगितली. माझ्यात आणि नोरामध्ये कधीही व्यावसायिक
व्यवहार झाला नाही, ज्याचा ती दावा करतेय. माझ्या फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिने
सहभाग घेतला तेव्हा तिच्या एजन्सीला अधिकृतपणे पैसे दिले गेले होते,’ अशी माहिती सुकेशने दिली.

Web Title :-  Nora Fatehi | sukesh chandrashekhar on nora fatehi allegations said i had already taken huge amount to her for home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Supriya Sule | ‘माझ्या भोळेपणाचा ‘त्या’ नेत्याने फायदा घेतला, मला उल्लू बनवलं!’ – सुप्रिया सुळे