नोराचा ‘हा’ ग्लॅमरस फोटो झाला व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था – एका नव्या ग्लॅमरस फोटोमुळे अभिनेत्री नोरा फतेही चांगलीच चर्चेत आली आहे. आधीच तिच्या आयटम साँगला चांगलीच पसंती भेटत आहे.  ‘स्त्री’मधील आयटम साँग असो किंवा ‘दिलबर’ गाण्यावरील तिची दिलखेचक अदा असो, तिला प्रेक्षकांकडून चांगलेच उचलून धरले जात आहे.

‘दिलबर’ गाणे तर ‘गुगल’वर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेले गाणे ठरले आहे. एके काळी नोरा ही  अभिनेत्रींना नृत्य शिकवण्याचे काम करायची परंतु आता ती  स्वतःच पडद्यावर दिसू लागली आहे. यावेळी ती पुन्हा चर्चेत आली आहे ते म्हणजे आयटम साँगमुळे नाही तर तिच्या एका ग्लॅमरस फोटोमुळे.

नोराच्या या ग्लॅमरस फोटो इतका व्हायरल होताना दिसत आहे की, तिच्या या फोटोला तब्बल 3 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांकडून याची मोठी स्तुती होत असून या फोटोला सर्वांनी चांगलेच उचलून धरले आहे.  ‘ बिग बॉस’मध्ये नशीब आजमावलेल्या नोराने अनेक चित्रपटांत आयटम साँग केले आहेत. अलीकडेच तिच्या (मूळ सुश्मिता सेनच्या!) ‘दिलबर’ गाण्याची अरबी आवृत्तीही आली आहे.
नोरा लवकरच ‘बाटला हाऊस’ आणि ‘भारत’ या चित्रपटांमधून दिसणार आहे. अनेक चित्रपटांत आयटम साँग करणारी नोरा  सर्वच प्रकारच्या नृत्यांमध्ये कुशल आहे, असे असले तरी ‘बेली डान्स हे तिचे ‘होम ग्राऊंड’आहे. तिच्या या कौशल्यामुळेच तर तिचे ‘दिलबर’ गाणे अधिक लोकप्रिय ठरले होते. आयटम साँग करण्यासोबतच ती आता  एक अभिनेत्री म्हणूनही स्थापित होऊ इच्छिते आहे असेही समजत आहे.