‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा ‘बार्बी लुक’ व्हायरल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नोरा फतेहीने आपल्या डान्सिंग स्टाईलने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ती नुकतीच बाटला हाऊसमध्ये आयटम साँग करताना दिसली होती. नोरा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. नोरा नेहमीच आपले नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच बार्बी लुकमधील एक फोटो समोर आला आहे.

फोटो पाहिला की, लक्षात येत आहे, नोराने रेड टँक टॉप घातला आहे. तिचे केसही पिंक कलरचे दिसत आहेत. नोराने रेड कलरची हॅटही घातली आहे. यावर लाईफगार्ड अलं लिहिलं आहे. नोराने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही नोरानिया हॉट गर्ल समरसाठी तयार आहात ?” नोराचा हा लुक बार्बी डॉलशी खूपच मिळता-जुळता आहे. चाहत्यांनाही नोराचा हा लुक खूप भावला आहे. अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नोरा म्युझिक व्हिडीओ बडा पछताओगे मध्ये नुकतीच दिसली होती. यात तिने विक्की कौशल सोबत काम केले होते. अरिजित सिंहने हे गाणं गायलं होतं. याशिवाय नोरा डायरेक्टर रेमो डिसूजाच्या स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमातही दिसणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.