‘या’ सिनेमात अभिनेत्री नोरा फतेही दिसणार एकदमच ‘BOLD’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता वरुण धवन, श्रद्धा कपूर, नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये काही ठिकाणी नोरा फतेहीचीही छलक पाहायला मिळते. नोराचा वेगळाच स्वॅग सिनेमात दिसणार आहे हे ट्रेलरवरून लक्षात येतं. नोरानं आल्या सेक्सी मुव्सनं ट्रेलरमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिनेमातील नोराच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर सिनेमता नोरा डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. नोराच्या भूमिकेला वेगळाच स्वॅग आणि अॅटीट्युड आहे. वेगळ्याच पद्धतीनं तिची भूमिका डिझाईन करण्यात आली आहे.

नोरानं अशा मुलीची भूमिका साकारली आहे जी लंडनमध्ये लहानाची मोठी झाली आहे. ही तरुणी खूपच बोल्ड परंतु तितकीच स्पोर्टी असणार आहे. ती एक कॉन्फिडंट मुलगी असणार आहे. यात तिचे हेअरदेखील लाल रंगाचे दिसणार आहे. तिच्या लुकमध्ये टोटल चेंज पहायला मिळणार आहे. नोरानं या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. कारण सिनेमा तिच्यासाठी केवळ सिनेमा नाही तर स्वप्न आहे. लहापणापासून तिची डान्सवर आधारीत सिनेमात काम करण्याची इच्छा होती. स्ट्रीट डान्सर थ्री डी या सिनेमाच्या निमित्तानं तिचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर स्ट्रीट डान्सर 3 डी हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. 2013 साली आलेल्या एबीसीडी या सिनेमाचा हा तिसरा पार्ट आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/