‘Despacito’ गाण्याला ‘स्पिन’ करत नोरा फतेहीनं तयार केलं ‘Coronasito’ ! पहा नोराच्या ‘डान्स’ मुव्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार नोरा फतेही आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. असा नोराचा आणखी एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा परसताना दिसत आहे. नोरानं डेस्पसिटो या गाण्याच्या ट्रॅकला कोरोनासिटो म्हणून पोस्ट केला आहे. व्हिडीओतील पात्रांना तिनं तिचा चेहरा लावला आहे. सिंगर ऐवजी त्यात नोराचा चेहरा पहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/B-hDl6dgZm3/

नोरानं तिच्या इंस्टवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यातील पात्रांना तिनं स्वत:चा चेहरा लावला आहे. भला मोठा कार्टुनसारखा लुक दिसत असल्यानं हा व्हिडीओ काहीसा कॉमेडी व्हिडीओ दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना नोरानं खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या नोराचा हा व्हिडीओ सोशलवर वाऱ्यासारखा पसरताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर अलीकडेच स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत.

https://www.instagram.com/p/B-aBb93h1ZB/

https://www.instagram.com/p/B-gLVNiJzxZ/

https://www.instagram.com/p/B-c-8dEJNxo/

https://www.instagram.com/p/B-cHSUUjAuS/

https://www.instagram.com/p/B-Q5BBlpk4i/

https://www.instagram.com/p/B-PfsU-BNZi/