Post_Banner_Top

नोरा फतेहीचे ‘ते’ व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या दमदार नृत्याने बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या डान्सच्या एका व्हिडीओ मुळे ती पुन्हा एकदा चर्चेत येत असल्याचे दिसत आहे. नोरा इन्स्टाग्रामवर चांगलीच नेहमी सक्रिय असते. तिचे डान्सचे व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकतेच नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. Zee Cine Awards चे हे व्हिडीओ आहेत. ते सध्या सोशलवर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

Zee Cine Awards मध्ये नोराने आपल्या डान्स सादरीकरणातून सर्वांचे मन जिंकले. याच शोमधील दोन व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने आपल्या ना ना या गाण्यावर डान्स केला आहे. याची खासियत अशी की, या व्हिडीओत पुन्हा एकदा नोराची वेगळी शैली दिसत आहे.

View this post on Instagram

Baby Naah 😉 👠 @zeecineawards @zeecineawards

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

दिलबर आणि कमरिया या गाण्यांनी अनेकांची मने जिकंत त्यांना आपल्या तालावर थिरकायला लावले. या गाण्यांवर नृत्य करणारी नोरा म्हणते की, “2018 हे माझ्यासाठी खास वर्ष ठरले आहे. याच वर्षी मी गायन क्षेत्रात पाऊल टाकलं. शिवाय सलमान खान सोबत भारत चित्रपटात मला काम करण्याची संधीदेखील मिळाली.”

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नोरा म्हणाली की, “मी 2018 मध्ये खूप मेहनत घेतली. हे माझं वर्ष होतं. मी इतकी मेहनत घेतली परंतु त्याचं असं फळ मिळेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. वर्षाचं सर्वात मोठं गाणं मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि मी एक अशी कलाकर आहे ज्याला ते मिळालं आहे. यासाठी मी आभारी आहे.” असे नोरा म्हणाली आहे.

Loading...
You might also like