विल्यम नोर्दहॉस, पॉल रोमर यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर

स्टोकहोम : वृत्तसंस्था

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने या दोघांच्या नावाची नोबेलसाठी घोषणा केली.विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर हे दोघे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे नागरिक आहेत. नोर्दहॉस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9de4618-caf3-11e8-b935-cb43d4ee92e5′]

या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळणार आहेत. या दोघांना १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे एका औपचारिक कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कारांची सुरुवात करणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र ,आरोग्य ,विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं संशोधन केलं आहे. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे.

[amazon_link asins=’B01L3I1BF0,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3cebe4d-caf3-11e8-bc76-57ff02bb07c9′]
यंदा साहित्यातला नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय नोबेल अकॅडमीकडून घेण्यात आला आहे. गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदाच साहित्यातला नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.