पोलिसांच्या तत्परतेने वातावरण निवळले, केडगावची परिस्थिती पूर्वपदावर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – व्यापाऱ्या सोबत झालेल्या वादवादीचे मारहाणीचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाल्यानंतर बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेने केडगावमधील वातावरण पूर्णपणे निवळले असून आता केडगाव बाजापेठेमध्ये शांततेत सर्व व्यवहार सुरू झाले आहेत.

केडगाव येथे रविवारी दुपारी किरकोळ वादातून येथील व्यापारी सुनील निंबाळकर यांना मारहाण झाली होती. याचा निषेध म्हणून सोमवारी अनेक व्यापारी आणि ग्रामस्थांनी केडगाव बाजारपेठ बंद ठेऊन निषेध सभा घेतली होती. ही निषेध सभा सुरू असतानाच काही तरुण त्या ठिकाणी आल्याने हेच आरोपी आहेत असे समजून जमावातील काहींनी या तरुणांना मारहाण केली. त्यांनतर या तरुणांचे नातेवाईक घटनास्थळी येऊन दोन्ही गटामध्ये दगडफेक आणि मारहानिस सुरुवात झाली. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी वेळीच पोलिसांसह केडगावमध्ये दाखल होत चिघळलेली संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आणून सर्व व्यापारी तसेच दोन्ही गटांतील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आणि गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करत त्यांना अटक केली. त्यामुळे आज दुपारपासून केडगाव बाजरपेठेतील सर्व व्यवहार पुन्हा शांततेत सुरू झाले असून कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.

Visit : Policenama.com