10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची ‘सुवर्ण’ संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर मध्य रेल्वेमध्ये गुड्स गार्ड, एएलपी, जेई आणि इतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची सुरुवात 21 ऑक्टोबर 2019 पासून सुरु झाली आहे. यासाठी र्जदाराला अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

पद आणि पद संख्या 
1. स्टेशन मास्टर – 05
2. गुड्स गार्ड – 53
3. सहायक लोको पायलट (इलेक्ट्रीकल/ मॅकेनिकल) – 50
4. सीनियर क्लर्क सह टाइपिस्ट – 51
5. सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 59
6. कमर्शियल सह तिकीट क्लर्क – 104
7. जूनियर क्लर्क सह टाइपिस्ट – 66
8. ट्रेन क्लर्क – 09
9. जूनियर ट्रांसलेटर (राजभाषा) – 10
10. जेई / मैकेनिकल वर्कशॉप – 05
11. जेई / इलेक्ट्रिकल / डिजाइन ड्राइंग और अनुमान – 04
12. जेई / ट्रैक मशीन – 44
13. टेक- III / C & W (मशीन) – 04
14. टेक- III / ट्रैक मशीन – 65

महत्वाच्या तारखा 
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 21 ऑक्टोबर 2019
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीखी – 20 नोव्हेंबर 2019 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)

वयोमर्यादा 
उमेदवारांचे अधिकतम वय 42 वर्ष असेल, पदांनुसार वयोमर्यादेत बदल देखील आहे.

शैक्षणिक पात्रता 
उमेदवारांचे किमान शिक्षण मान्यता प्राप्त बोर्डमधून 10वी / 12वी / आईटीआई / ग्रेजुएशन / पोस्ट ग्रेजुएशन डिग्री पर्यंत असावे.

अर्जाचे शुल्क 
अर्जदारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

असा करा अर्ज 
इच्छुक उमेदवार https://www.rrcald.org/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2019 पासून सुरु होईल तर अंतिम तारीख 20 नोव्हेंबरपर्यंत आहे.

निवड प्रक्रिया 
उमेदवारांची निवड सीबीटी ऑनलाइन टेस्ट आणि स्किल टेस्टच्या आधारे करण्यात येईल.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like