‘या’ कारणाने गुजरातमधून होतंय उत्तर भारतीयांचं पलायन

गांधीनगर : वृत्तसंस्था
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले सुरूच आहेत. एका १४ वर्षच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारी  व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. गुजरातमध्ये परप्रांतियांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन वातावरण तापलं आहे. आत्तापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोक गुजरात मधून बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतरच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने बिहार आणि उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे .
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64f8b950-caea-11e8-96b9-5fcfcc23580a’]
गुजरात पोलिसांनी या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत ठिकाणी ४२ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात असून ३४२ जणांना अटक केली आहे. अहमदाबाद, मेहसाणा, साबरकांठा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
काय आहे गुजरातमधील प्रकरण?
गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यात एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेतला आरोपी हा बिहारमधला एक मजूर  असल्याचं स्पष्ट झालं.या प्रकरणी  रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली.या घटनेनंतर सोशल मीडियावरून प्रक्षोभक मेसेज पसरविले गेले. त्यानंतर हल्ल्यांना सुरूवात झाली. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधल्या नागरिकांना लक्ष  करण्यात आलं.
 [amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0bf0afa-caea-11e8-a6ce-0719e3bc654e’]
पोट भरण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील लोक आता गुजरात सोडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या बस आणि ट्रेन भरुन जात आहेत.
मध्य प्रदेशातील भिंड या आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या राजकुमारी जाटवने सांगितलं, की ”माझा मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला. पती रंगाचं काम करुन घर चालवतात.” तर भिंडच्या धर्मेंद्र कुशवाह यांच्या मते, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशच्या कमीत कमी  ५००० लोकांनी आतापर्यंत गुजरात सोडलं आहे.
सत्यम ट्रॅव्हलसचे पिंटो सिंह यांच्या माहितीनुसार, ”मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गुजरातमधून दोन दिवसांनी एक बस जाते, ज्यात २५ प्रवासी असतात. पण आता एका बसमध्ये ८० ते ९०  जण जात आहेत. शिवाय एका दिवसाला २० बस भरुन जात आहेत.”
 [amazon_link asins=’B079NBHCKM,B0764XDVV9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fda4bcb5-caea-11e8-b479-3d4bcc820d67′]
चिंताजनक ! ३ वर्षात १२ पोलीस नोकरी सोडून अतिरेकी बनले
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी सोडून अतिरेकी झाल्याच्या घटनांनी पोलीस विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या ३ वर्षांत १२ पोलीस सुमारे ३० शस्त्रांसह फरार  झाले आहेत. अलीकडेच पोलीस अधिकारी आदिल बशीर असेच पसार झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी असा प्रकारच्या घटनांसंदर्भात एक विभागांतर्गत अहवाल तयार केला आहे.