Coronavirus : ‘कोरोना’बद्दल उत्तर कोरियाची झाली ‘पोलखोल’, ‘गुपचूप’ चालू होतं ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या दुर्घटनेशी झगडत आहे, तेव्हा उत्तर कोरियाचा शासक किम जोंग क्षेपणास्त्र चाचण्या घेतो आहे. उत्तर कोरियामध्ये अधिकृतपणे कोरोना विषाणूची एकाही घटना घडलेली नाही. मात्र, उत्तर कोरियाच्या या दाव्याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका नव्या अहवालानुसार उत्तर कोरिया सार्वजनिकपणे कोरोना विषाणूचे एकदेखील प्रकरण न येण्याचे जाहीरपणे बोलत आहे परंतु व्हायरसचा सामना करण्यासाठी छुप्या मार्गाने इतर देशांची मदत घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरीयाचे अधिकारी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी इतर देशातील सहका-यांची गुप्तपणे मदत घेत आहेत. तसेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनाकडूनही मास्क आणि चाचणी मशीन पाठविण्यास सांगितले आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची 7 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली असून आणि 33000 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. परंतु उत्तर कोरिया स्वत: ला यापासून अस्पृश्य सांगत आहे.

उत्तर कोरियाने जानेवारीच्या शेवटी चीनशी असलेली आपली सीमा बंद केली. तसेच जानेवारीत चीनमधील 590 नागरिकांची चाचणी केली होती, परंतु सर्वांचा निकाल नकारात्मक आला होता. दक्षिण कोरियाच्या माध्यमांतील सर्व अहवालांमध्ये असे म्हटले आहे की उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूमुळे बर्‍याच मृत्यू झाल्या आहेत, परंतु ते जगापासून लपवत आहेत. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान कोरोना विषाणूमुळे उत्तर कोरियाचे 180 सैनिक ठार झाले आणि 3700 सैनिकांना क्वारंटाईन ठेवल्याचे समजते,

दक्षिण कोरियाच्या एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, चीनला लागून असलेल्या सिनुइजू या प्रांतात किमान दोन संशयास्पद घटना घडल्या आहेत. तसेच आणखी एका अहवालात सिन्इजूमध्ये कोरोना विषाणूमुळे जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तर कोरियामधील आरोग्य सेवा कमकुवत आहे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा पुरेसा नाही. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा धोकादायक प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरिया सरकारकडे कोरोना व्हायरस टेस्टिंग किट आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे माहित आहे परंतु त्याची संख्या पुरेशी नाही, म्हणून अधिकारी सर्व संघटनांकडून मदतीसाठी विचारत आहेत. मात्र चीनची सीमा बंद झाल्यामुळे अशासकीय संस्थांना उत्तर कोरियापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. 18 मार्च रोजी किम जोंग-उनने सर्वांना चकित करत कबूल केले की, आपल्या देशात आधुनिक वैद्यकीय सुविधा नाहीत आणि त्या सुधारण्याची गरज आहे. दरम्यान, किमच्या आदेशावरून मागील आठवड्यात प्योंगयांग जनरल हॉस्पिटल बांधले जात असल्याचे समजते.