20 दिवसानंतर समोर आलेल्या ‘किम जोंग उन’च्या शरीरावर रहस्यमयी ‘खुणा’, डॉक्टरांनी सांगितलं ‘असं’ काही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन 20 दिवस सार्वजिक दृष्ट्या न दिसल्यानंतर 1 मे रोजी खताच्या कारखान्याचे उद्घाटन करताना दिसून आला. याआधी आंतरराष्ट्रीय माध्यमात त्याच्या आरोग्याविषयी अनेक अटकळ बांधली जात होती. आता एका वाहिनीने वैद्यकीय तज्ज्ञांचा हवाल्याने दावा केला आहे कि, किम जोंगच्या शरीरावर असणारी खून हृदय शस्त्रक्रिया संदर्भात संकेत असू शकतो. माहितीनुसार, 1 मे रोजी किम जोंग उन उत्तर कोरियाच्या सुन्चोन येथे खताच्या कारखान्याचे उद्घाटन करताना दिसून आला. त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार किम जोंगच्या हातावर एक सुई आहे जी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रक्रियेदरम्यान असू शकते.

किमच्या बेपत्ता होण्याच्या वेळी एका अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकारी किमच्या हृदय शस्त्रक्रियेसंदर्भातील अहवालाचे निरीक्षण करत आहेत. त्याचबरोबर नवीन फोटोंमध्ये त्याच्या हातावरही एक खूण आहे. जी याआधी कधीही पहिली गेली नव्हती. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही 20 दिवसांनंतर किमच्या समोर येण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले कि, ‘मला आनंद आहे की, ते परत आले आणि चांगले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांना किमबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.

किमच्या खत कारखान्याच्या उद्घाटनाचे फोटो व व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियामध्ये माध्यमांनाही स्वातंत्र्य नाही, म्हणून स्वतंत्र एजन्सींना या फोटोंची सत्यता सिद्ध करणे शक्य झाले नाही. 15 एप्रिल रोजी किम जोंग आपल्या आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल संग यांच्या वाढदिवसादिवशी उपस्थित नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. उत्तर कोरियाची 15 एप्रिल रोजी सुट्टी असते आणि या दिवशीचा राष्ट्रीय कार्यक्रम खूप महत्वाचा मानला जातो.

दरम्यान, किमच्या बेपत्ता होण्याच्या वेळी दक्षिण कोरियाचे मंत्री किम येओन चुल म्हणाले की, कोम जोंग कदाचित कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी दिसू शकले नाहीत. मात्र, उत्तर कोरिया अधिकृतपणे देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी माहिती देत नाही.