North Korea : ‘हुकूमशहा किम जोंग उन’नं लहान बहिणीकडं सोपविली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत इशारा दिला आहे. तसेच त्यांची बहीण किम यो जोंग यांच्याकडे काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. अलीकडे अशी बातमी आली होती की आता किमची बहीण देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. किमच्या बहिणीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संबंधांची जबाबदारी आहे. किमने त्यांच्या पक्षातील सदस्यांना इशारा दिला आहे की त्यांचा देश आता अशा प्रकारच्या आव्हानांकडे वाटचाल करत आहे ज्यांचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता.

किम जोंगने दिला कठीण परिस्थितीचा इशारा

किम यांच्या मते, त्यांनी ठरवलेल्या विकासकामांच्या लक्ष्यांनाही मोठा फटका बसला आहे. देशाच्या माध्यमांनी ही माहिती दिली आहे. किमच्या बैठकीनंतर दक्षिण कोरियाच्या खासदारांनी सांगितले की देशाच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार किमने त्यांच्या बहिणीकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून किमची बहीण सतत मुत्सद्दी निर्णय घेत होती. त्यांच्या वतीनेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्राचे उत्तर देण्यात आले. या पत्रात किमच्या बहिणीने म्हटले आहे की, आता अमेरिकेशी बोलण्याचा काही फायदा नाही कारण ते निवडणुकीसाठी उत्तर कोरियाचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

दरम्यान सध्या किम कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनासारख्या व्यवस्थेचे अनुसरण करीत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे उत्तर कोरियामध्ये सध्या अन्नधान्याचे मोठे संकट आहे. देशाचा 90 टक्के हिस्सा चीनच्या पाठीशी आहे आणि या कारणास्तव परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. काही आठवड्यांपूर्वी युनायटेड नेशन्सने उत्तर कोरियामधील बहुतेक कुटुंबे ही फक्त एकवेळ अन्न ग्रहण करून जगत असल्याचे सांगितले होते.