सावधान ! ‘गायब’ होऊ शकते तुमच्या आयुष्याची कमाई, ATM असणार्यांसाठी ‘हे’ संकट, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएमचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एटीएमचा वापर करणाऱ्यांनी जरा जपून वापर करा अन्यथा अनेक वर्षांची आपली कमाई काही सेकंदात गायब होऊ शकते. उत्तर कोरियामधून एक मालवेयर व्हायरसच्या माध्यमातून भारतीय एटीएम वापरणाऱ्या लोकांचा डेटा चोरी केला जात आहे.
काय आहे नेमकं मालवेयर
कॅस्परस्काय ग्लोबल रिसर्च अॅंड अॅनालिसिस टीमच्या सिक्युरिटी रिसर्चर कोन्स्टान्टिन जायकोव्ह यांनी या मालवेयर बाबत माहिती दिली आहे. जायकोव्ह नुसार पैसे चोरणारा एक ग्रुप हे कृत्य करत आहे. या ग्रुपबाबत सर्वात आधी 2014 मध्ये खुलासा करण्यात आला होता, जेव्हा या ग्रुपने सोनी पिक्चर्स इंटरनटेनमेंट वर अटॅक केला. याच ग्रुपने 2016 मध्ये अमेरिका आणि ब्रिटनसहित अनेक देशांवर सायबर अटॅक केला होता.
कॅस्परस्काई रिसर्चर्स ने ATMDtrack मालवेयरचे संशोधन केले. 2018 पासून भारतीय लोक यांच्या निशाण्यावर आहेत. सिक्युरिटी रिसर्चर्स टीमच्या अनुसार हा व्हायरस एटीएममध्ये प्लांट केला जातो त्यानंतर हा व्हायरस कार्ड आणि पिनची माहिती रेकॉर्ड करतो. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे बँक अकाऊंटमधले पैसे गायब केले जातात.
हा व्हायरस इतका घातक आहे की हा सांगू शकतो की तुम्ही कधी कोणत्या एटीएमध्ये कोणता पिन टाकलेला आहे. दूरवर बसलेला हॅकर सुद्धा याला सहज वापरू शकतो.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय