ब्रिटनच्या कोरोना वॅक्सीनचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न, उत्तर कोरियन हॅकर्सवर संशय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी वॅक्सीन बनवत असलेली ब्रिटिश औषध कंपनी एस्ट्राजेनेका आता उत्तर कोरियाच्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. या प्रकरणाची माहिती दाने व्यक्तींनी रॉयटर्सला देताना म्हटले की, मागील काही आठवड्यात उत्तर कोरियाच्या हॅकर्सने एस्ट्राजेनेकाची सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर कोरियाच्या हॅकर्सने नेटवर्किंग साइड लिंक्डइन आणि व्हॉट्सअपच्या द्वारे एस्ट्राजेनेकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हॅकर्सने स्वताला रिक्रुटर्स म्हणजे नोकरी देणारा असल्याचे सांगितले आणि एस्ट्राजेनेकाच्या स्टाफला नोकरी देण्याची बनावट ऑफर दिली. रॉयटर्सच्या सूत्रांनी सांगितले की, हॅकर्सने एस्ट्राजेनेकाच्या स्टाफला एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये जॉब बाबत डिटेल्स होत्या. परंतु, येथे त्याने हॅकिंगसाठी कोडिंग केले होते.

उत्तर कोरियन हॅकर्सचा प्रयत्न आहे की, या ईमेल्सद्वारे पाठवलेल्या कोड्सद्वारे ते एस्ट्राजेनेकाच्या कर्मचार्‍यांचे कम्प्यूटर हॅक करून त्यामधून कोरोना वॅक्सीनशी संबंधित माहिती चोरू शकतात. हॅकर्सला हे माहित नव्हते की, कोणता कर्मचारी कोरोना वॅक्सीनच्या रिसर्चमध्ये आहे. यासाठी त्यांनी जवळपास प्रत्येक विभागाच्या कर्मचार्‍यांना नवीन नोकरीचा ईमेल पाठवला. हा ईमेल कोरोना रिसर्चमध्ये असलेल्या काही कर्मचार्‍यांकडे सुद्धा आला.

जेव्हा जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात असलेल्या उत्तर कोरियन मिशनला याबाबत विचारण्यात आले तेव्हा कोणत्याही अधिकार्‍याने कोणतेही उत्तर दिले नाही. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगने अगोदर सायबर हल्ल्याबाबत नकार दिला होता. हैराण करणारी बाब म्हणजे उत्तर कोरिया परदेशी मीडियाशी थेट बोलत नाही. ते आपल्या बातम्या स्वताच जगापर्यंत पोहचवतात. यासाठी त्यांच्या स्वताच्या मीडिया संस्था आणि पीआर हाऊसेस आहेत.