Corona Virus : नार्थ कोरियामध्ये आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण, किम जोंगनं दिला गोळया घालून ठार मारण्याचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या चपाट्यात आहे. चीनमध्ये या विषाणूने 2780 लोकांचा बळी घेतला आहे. परंतु यादरम्यान, असा एक देश आहे जेथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्याला गोळ्या घालण्याचा आदेश सरकारने दिला आहे. उत्तर कोरिया हा प्रकार घडल्याचे समजते. हुकूमशहा किम जोंग-उनने आपल्या देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याला शिक्षा केली असून किमने कोरोना व्हायरस पीडिताला गोळ्या घालण्याचे आदेश दिले.

उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशात त्याचा प्रसार होऊ नये म्हणून केलेली कृती अतिशय भयानक आहे. हुकूमशहा किम जोंग-उन यांनी कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या चीनमधून परत आलेल्या उत्तर कोरियाच्या व्यावसायिकाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. ज्या व्यापाऱ्याला गोळ्या घालून मारले गेले, तो काही दिवसांपूर्वी चीनहून परत आला होता, त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर केला. त्या व्यक्तीकडून कोरोना विषाणूचा प्रसार इतरांपर्यंत होऊ नये, म्हणून उपचाराच्या ठिकाणीच त्याला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये हा विषाणू पसरलेला नाही, म्हणूनच त्याला जिवे मारण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर कोरियाच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, त्यांच्या देशात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही आणि त्याने परिस्थितीशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

दरम्यान चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत 2,870 लोकांचा जीव घेतला आहे. तर पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 79,824 झाली आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या या विषाणूने चीनच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चीनच्या आरोग्य अधिका-यांनी सांगितले की, त्यांना शनिवारी चीनमध्ये संसर्गाच्या 573 नवीन पुष्टी आणि 35 जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली. तसेच शनिवारी रात्रीपर्यंत एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 79,824 वर पोचली असून अद्याप 35,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच 41,625 रूग्ण असे आहेत ज्यांना रुग्णालयातून बरे केले गेले आहे तर 2,870 लोक या आजाराने मरण पावले आहेत.

आयोगाने म्हटले आहे की, अद्याप 851 लोकांना व्हायरसची लागण होण्याची शंका आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, 51,856 लोकांना रूग्णांशी जवळचा संबंध असल्याने त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले गेले आहे. शनिवारी, 8,620 लोकांना वैद्यकीय देखरेखीखाली सोडण्यात आले.