10 वी पास उमेदवारांना खुशखबर ! रेल्वेमध्ये 4499 पदांसाठी मेगा भरती, परीक्षेविना सलेक्शन, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Northeast Frontier Railway Act Apprentice Recruitment 2020 : इंडियन रेल्वेच्या उत्तर-पूर्व रेल्वेने (एनएफआर) अप्रेंटिसच्या 4499 पदांसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2020 पर्यंत सबमिट करावा. ही भरती कटिहार, अलीपुरद्वार, रंगिया, लुमडिंग, तिनसुकिया, न्यूबोंगॅनगांव आणि डिब्रूगढचे डिव्हिजन / वर्कशॉपमध्ये होणार आहे.

पदांची एकुण संख्या – 4499

महत्वाच्या तारखा :

1 नोटिफिकेशन जारी झाल्याची तारीख – 13-08-2020.

2 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 16-08-2020.

3 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15-09-2020.

पदांची महिती :

1 कटिहार (केआईआर) टीडीएच वर्कशॉपसाठी एकुण – 970 पदे.

2 अलीपुरद्वार (एपीडीजे) साठी एकुण – 493 पदे.

3 रंगिया (आरएनवाय) साठी एकुण – 435 पदे.

4 लुमडिंग (एलएमजी) एसटी / वर्कशॉपसाठी एकुण – 1302 पदे.

5 तिनसुकिया (टीएसके) साठी एकुण – 484 पदे.

6 न्यूबोंगॅनगांव वर्कशॉप (एनबीक्यूएस) ईडब्ल्यूएस / बीएनजीएनसाठी एकुण – 539 पदे.

7 डिब्रूगढ वर्कशॉप (डीबीडब्ल्यूएस) साठी एकुण – 276 पदे.

पात्रता निकष :

शैक्षणिक पात्रता

असे उमेदवार ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून 10वी इयत्ता किंवा तिच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांनी पास केली आहे + संबंधीत ट्रेडचा आईटीआय केला आहे, ते अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमयार्दा

अप्रेंटिस पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2020च्या नुसार किमान 15 वर्ष आणि कमाल 24 वर्ष असले पाहिजे.

नोट – रिझर्व्ह कॅटगरीसाठी कमाल वयाच्या मर्यादेत नियमानुसार सूट दिली जाईल.

परीक्षा शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एससी / एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही प्रोसेसिंग फी ठरलेली नाही, तर अन्य उमेदवारांसाठी प्रोसेसिंग फी 100/- रुपये आहे.

निवड प्रक्रिया

अ‍ॅप्रेंटिससाठी पात्र आणि योग्य उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल.

अर्ज कसा करणार

या पदांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज मान्य केले जातील.

इम्पॉर्टन्ट लिंक्स

नोटिफिकेशनशी संबंधीत कोणत्याही माहितीसाठी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट https://nfr.indianrailways.gov.in/ वर लॉग इन करावे.