काश्मीर खोऱ्यात पाक करु शकत नाही शस्त्र पुरवठा, आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राइक’साठी भारतीय सैन्य तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कराचे उत्तरी कमानचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की पाकिस्तान, काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवू शकत नाही. यामुळे खोऱ्यातील दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्र पळण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले की जम्मू काश्मीरच्या एलओसीच्या आसपास कडक सुरक्षा तैनात असल्याने दहशतवादी दुसऱ्या सीमेवरुन घुसखोरी होते. दहशतवादी लखनपूरमधून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.

सर्जिकल स्ट्राइक संबंधित कमांडर सिंह यांनी सांगितले की, हा पर्याय भारतीय सैन्याकडे आहे की कोणत्या पर्यायाचा वापर करायचा आणि सैन्याचा कसा वापर करायचा. हे स्थितीवर अवलंबून असेल. सैन्य कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही आव्हानाला स्विकारण्यास तयार आहे. जे परिस्थिीती आणि संधीवर अवलंबून असेल.

सैन्य पूर्णता तयार –
ते म्हणाले की पाकिस्तान सध्या घाबरलेल्या परिस्थितीत आहे आणि काश्मीर खोऱ्यात शस्त्र पाठवण्याचे वेगवेगळे प्रयत्न करत आहे. सिंह यांनी या वेळी खोऱ्यातील अफगाणिस्तानातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची चर्चा खोटी असल्याचे सांगितले.

कमांडर सिंह म्हणाले की जवळपास 200 – 300 दहशतवादी जम्मू काश्मीरमधील शांत भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 500 दहशतवादी सीमेवर विविध लॉन्च पॅडवर प्रशिक्षित केले जाते आहे. परंतू घुसखोरी रोखण्यासाठी कोणताही हल्ला हाणून पाडण्यास सैन्य तयार आहे.

एलओसी ओलंडणाऱ्यांना प्रतिउत्तर दिले जाईल –
नियंत्रण रेषा (एलओसी) जवळ स्थानिक लोकांच्या विरोधात प्रदर्शन संबंधित विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंह म्हणाले की आमची चेतावणी अजून ही लागू आहे. जर एखादी व्यक्ती, पाकिस्तान सैन्याचे समर्थक नियंत्रण रेषा पार करणाऱ्यांना प्रयत्न करतील तर त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. आमचे धोरण या बद्दल एकदम स्पष्ट आहे. सैन्य आणि अधिकाऱ्यांना या संबंधित स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Visit : Policenama.com