रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! दरमहा 75 हजार रूपये वेतन, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपणही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी मोठी फायद्याची ठरू शकते. कारण आता भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागामध्ये मेगा भरती होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना दरमहा 75 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या सर्व उमेदवाराची मुलाखती 6 एप्रिल रोजी होणार आहे.

उत्तर रेल्वे विभागाकडून मेडिकल प्रॅक्टिशनर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही निवड पूर्णवेळ पदासाठी असणार आहे. त्यानुसार, पात्र उमेदवारांना उत्तर रेल्वेमध्ये जनरल ड्युटी मेडिकल प्रॅक्टिशनर्सच्या (GDMO) पदासाठी कराराच्या आधारे सेवेत सामावून घेतले जाणार आहे. रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काय आहे पात्रता ?
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पूर्ण केले असावे. तसेच एक वर्षांचा रोटेटिंग इंटर्नशिपही असावे. कोणत्याही राज्य परिषदेकडील वैध नोंदणी मान्यताप्राप्त आवश्यक.

वेतनमान किती ?
मेडिकल प्रॅक्टिशनर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 75,000 रुपये दिले जाणार आहेत.

वयोमर्यादा काय ?
पात्र उमेदवारांची वयोमर्यादा नियोजित केली आहे. त्यानुसार उमेदवार 50 वर्षांपेक्षा जास्त नसावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमांनुसार त्यामध्ये सवलत असणार आहे.

असा करा अर्ज…
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 6 एप्रिल, 2021 रोजी मुख्य वैद्यकीय अधीक्षक, मंडल रेल्वे हॉस्पिटल, उत्तर रेल्वे/डीएलआय येथे मुलाखतीसाठी जावे.

मुलाखतीची नियोजित वेळ काय ?
या पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती 6 एप्रिल, 2021 सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणार आहेत. तर या मुलाखती दुपारी अडीचपर्यंत सुरु असतील. पण या सर्व उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी सकाळी साडेआठपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.