उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते ? अशी घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळा तीव्र असेल तर नाकातून रक्त येणं ही समस्या अनेकांना भेडसावते. अशावेळी योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे ठरते. उन्हाळ्यात अचानक नाकातून रक्त आल्यास संबंधित व्यक्ती घाबरून जाते. परंतु, हा त्रास अनेकांना होतो. नाक आतल्या बाजूने कोरडं पडलं की नाकातून रक्त येतं. मात्र वयस्कर व्यक्तींमध्ये हापयपरटेन्शमुळे देखील हा त्रास उद्भवू शकतो.

यासाठी अधिक काळजी घ्यावी. नाकाला बर्फ लावावा, डोक्यावर बर्फाचं ठेवावं, वयस्कर व्यक्तींचा बीपी तपासून त्यांनी औषधं द्यावीत. नाकाच्या हाडामध्ये खूप लहान लहान रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यावर जेलीसारख्या द्रव पदार्थाचा थर असतो. मात्र उन्हाळ्यात गरम हवेमुळे हा द्रव पदार्थ सुकून जातो. त्यामुळे रक्तवाहिन्या उघड्या पडून त्या फुटण्याचा धोका असतो. यासाठी काही काळजीही प्रत्येकाने घेतली पाहिजे.

जास्त कडक उन्हात जाणे टाळावे, उन्हात जाताना नाकाला त्रास होणार नाही म्हणून स्कार्फ बांधावा, नाक आतल्या बाजूने सुकणार नाही याची काळजी घ्यावी, नाक ओलं ठेवण्यासाठी नाकात विशिष्ट प्रकारचे ड्रॉप्स घालावेत आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. नाकातून रक्त येणं हे शक्यतो धोकादायक नसतं. मात्र जर हे रक्त चुकून श्वासनलिकेत गेलं तर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाकातून रक्तस्राव झाल्यास नाकावर रूमाल धरू नये जेणेकरून रक्त श्वासनलिकेत जाणार नाही.

Loading...
You might also like