खूप प्रयत्न करूनही वजन कमी न होण्याची ‘ही’ ७ कारणे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइझ करातात. मात्र तरीदेखील वजन कमी होत नाही तर ते अधिकच वाढत जाते. आजकाल वजन कमी करण्यासाठी महिला आणि पुरूष दोघेही खुप प्रयत्न करतात. सुडौल बांधा असावा असे अनेकांना वाटते. त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करायला तयार असतात. खानपान आणि व्यायाम याचे कठीण सूत्र पाळून देखील काहींचे वजन कमी होऊ शकत नाही. त्यामुळे नैराश्य तर येतेच त्यासोबत अधिक वजनाने अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते. परंतु व्यायाम करून आणि खानपानाच्या सवयी बदलून देखील वजन का कमी होत नाही ? याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊया.

Image result for वॠयायाम ठकाच रूटीन मधॠये करणेÂ

1 ) एकाच रुटीनमध्ये व्यायाम करणे –
दररोज एकाच रूटीनमध्ये व्यायाम केल्याने सुरवातीला वजन घटल्याचे दिसले तरी हळूहळू त्यात बदल दिसून येणे बंद होते. शरीराला या व्यायाम प्रकाराची सवय होते आणि शरीर त्याला परिणाम देणे बंद करते. त्यामुळे रोज सारखाच व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करावा.

2) जास्त मीठ खाणे टाळा –
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहेऱ्यावर जर सूज दिसत असेल तर समजावे की शरीरामध्ये मिठाचे प्रमाण अधिक आहे. शरिरात मिठाचे प्रमाण वाढल्यास किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाणी बाहेर पडण्यास अडथळे येतात. शरीरातील या अधिक पाण्याने वजन कमी होत नाही.

Image result for आपलॠया शरीरातील हारॠमोनॠसचा अंदाज न घेता खाणे

3) शरीरातील हार्मोन्सचा अंदाज न घेता खाणे 
प्रत्येकाच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी हि वेगवेगळी असते. त्यामुळे अनेक प्रयत्न करून देखील वजन कमी होत नसेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि हार्मोन्सची तपासणी करावी आणि त्याप्रमाणेच डाएट आणि व्यायाम करावा.

Image result for पौषॠटिक पदारॠथांचे अधिक सेवनÂ

4) पौष्टिक पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन – 
पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हे वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही पदार्थाचे अधिक सेवन करणे हे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. पौष्टिक पदार्थांचे सेवन भलेही वजन वाढवत नसले तरी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र अडचणी निर्माण करू शकतात.

Related image

5) उशिरा जेवण करणे टाळावे –
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यात रात्रीचे जेवण हे नेहमी हलके आणि झोपण्याच्या २ तास आधी करावे. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे. शतपावली करावी अर्थात केवळ १०० पावले चालावे. त्यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रिया पूर्ण होऊन फॅट्सचे रूपांतर एनर्जीत होते.

Image result for ठोपेचॠया वेळा सांभाळाÂ

6) झोपेच्या वेळा सांभाळणे महत्वाचे –
शरिर निरोगी राहण्यासाठी २४ तासांपैकी ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. तसेच दुपारी झोप घेणे टाळावे. वामकुक्षी ही केवळ २० ते ३० मिनिटेच घ्यायला हवी.


7) वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा –

वजन कमी करण्यासाठी काही जण योग्य सल्ला न घेता शरीराला बाधक अशा मार्गाचा अवलंब करतात. वजन कमी जास्त करण्यासाठी नेहमी तज्ज्ञ किंवा वैद्यकीय सल्ला घेऊनच सुरुवात करावी.

Visit : Policenama.com