काय सांगता ! होय, शेतीतून कमावले 1 कोटी 20 लाख

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव गावामधील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव लडकत यांनी १४ एकर शेतात द्राक्षाच्या पिकातून तब्बल १ कोटी २० लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

ज्ञानदेव लडकत यांना १९७१ सालापासून १ एकर जमीन होती. त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच होता. नंतर त्यांनी अजून १ एकर शेती घेतली आणि २०१० ला द्राक्षची शेती सुरू केली. आता त्यांच्याकडे १४ एकर शेती आहे. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार, औषधांची फवारणी करून नियोजन करावं लागतं, असं लडकत यांनी सांगितलं. आज लडकत यांची दोन्हीही मुले शेती करत आहेत.

लडकत कुटुंब हे स्वतः च द्राक्षांवरती सतत प्रयोग करत असतात. १४ एकर द्राक्ष बागेतुन त्यांना वर्षाला १ कोटी २० लाख रुपये मिळाले. त्यांनी बागेतील द्राक्षे ची विक्री कोलकत्ता, पुणे, नागपूर, जम्मू काश्मीर, तसेच इतर राज्यातील व्यापाऱ्यांना प्रति किलो ४० रुपयाने केली. खते, ओषध, शेणखत असा १४ एकराला ३५ लाख रुपये इतका खर्च येतो. त्यांना हा सर्व खर्च वजा करून निवळ नफा १ कोटी २० लाख रुपये मिळाला आहे.

पारंपारिक शेतीला फाटा देत पाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसंच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने लडकत यांना चांगला फायदा झाला आहे. लडकत यांना कुटुंबाची मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. आज त्याची दोन्ही मुलं ही शेती करतात.

आज लडकत यांची ७० एकर शेती आहे, त्यांनी कधीही सरकारची कर्ज माफी घेतली नाही. बँकेतून कर्ज घेतले असता त्यांनी वेळेच्या आता फेडले. त्याचबरोबर लडकत हे म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत कारण तेथील परिस्थिती वेगळी आहे. १ एकरासाठी कर्ज १० एकराचे घायचे मग ते फिटणार कसं, शेतीचं नियोजन केल्यास आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही. असंही लडकत म्हणाले.