फ्लेक्सबाजी चुकीचीच ! ‘फ्लेक्स’ पाहून नाही तर ‘काम’ कारणाऱ्यालाच उमेदवारी : देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बॅनरबाजी करून विद्रुपीकरण करणे हे चुकीचेच आहे. फ्लेक्स लावून कोणाला उमेदवारी मिळत नाही तर ती काम पाहूनच दिली जाते, अशा कानपिचक्या इच्छुकांना दिला मात्र विद्रुपीकरण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बगल दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी पुणे शहरात महाजनादेश यात्रा होती. यात्रेवरील सर्व मार्गांवर भाजपचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा फ्लेक्स, बॅनर लावले होते. एकीकडे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाया अतंर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू असून पालिका यासाठी मोठा खर्च करत आहे. असे असताना पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गणेशोत्सव आणि महाजनादेश यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी करून विद्रुपीकरण केल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. संदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

यावर फडणवीस यांनी फ्लेक्सबाजी करणे चुकीचे आहे. आदल्या दिवशी मला माहिती मिळाल्यानंतर मी कार्यकर्त्यांकडे नाराजी ही व्यक्त केली. फ्लेक्सबाजी करून उमेदवारी मिळत नाही, काम कारणाऱ्यालाच उमेदवारी देण्यात येते असा इशाराच त्यांनी यावेळी फ्लेक्सबाजाना दिला. फ्लेक्सबाजांवर पक्षांतर्गत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे माफक उत्तर त्यांनी दिले. तसेच महाजनादेश यात्रेसाठी झाडाच्या फांद्या छाटल्या असतील यावर विश्वास नाही, परंतु याबद्दल माहिती घेऊन पुढील कारवाई करू असेही त्यांनी नमूद केले.

You might also like