जगभरात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ‘हे’ केल्यास सर्वकाही होईल सुरळीत, तज्ज्ञांनी सुचवला सोपा उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यावर आता तज्ज्ञांनी उपाय सुचवला आहे.

संपूर्ण जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत आत्तापर्यंत फक्त 0.3 टक्के लोकांनाच लस मिळाली आहे. लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही पुरेशा प्रमाणात लस मिळत नाहीत. जगभरात दरमहा 170 कोटी डोस तयार होत आहेत. मात्र, जगभरात लसींसाठी लागणारा कच्चा माल आणि आवश्यक यंत्रांचा पुरवठा कमी आहे.

सध्या लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पण आता त्यावर विविध उपाय सुचवण्यात आले आहेत. पण ते आहेत तरी काय? जाणून घ्या…

सिक्रेट करावे शेअर

औषध निर्मिता कंपनीने कोरोनावरील औषध किंवा लस कशाप्रकारे निर्मिती केली जाते, त्याचे सिक्रेट जगातील इतर औषध निर्माता कंपनीसोबत शेअर करणे गरजेचे आहे. त्याने जगभरातील औषध निर्माता कंपनी आपापल्या परीने लस किंवा औषध निर्मितीवर लक्ष देतील. मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांच्या मदतीने औषधांची निर्मिती करून शकेल.

छोट्या कंपन्यांनाही होणार फायदा

कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने लसींची निर्मिती कशी केली जाते, याचे सिक्रेट शेअर केले तर छोट्या कंपन्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. असे केल्याने लसींचे उत्पादन वाढवता येऊ शकेल. हे सर्व छोट्या कंपन्यांच्या माध्यमातून केले जाणार असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

पेटंट काढण्याची गरज नाही भासणार

कोणत्याही कंपनीने आपल्या लशींचा पेटंट काढण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे कोणत्याही विशेष लसींवर आधारित राहता येणार नाही. दुसरी औषध निर्माता कंपनी आपापसात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केल्याने इतर औषध कंपन्यांनाही शिकता येईल आणि लसी उत्पादनाची संधीही मिळेल.

WTO चा दबाव

द वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनायझेशन (WTO) हेच असे ठिकाणी आहे जिथं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सामंजस्य होऊ शकते. इथे सर्वात मोठ्या कंपन्या डील करू शकतील. WTO ने डील केल्यास औषध निर्माता कंपन्यांवर आंतरराष्ट्रीय दबावही असू शकेल. याशिवाय लक्ष्य लवकर पूर्ण करण्याची संधी मिळेल.

…तर महामारी रोखणे कठीण

WTO चे महासंचालक एनगोजी ओकोन्जो इविआला यांनी सांगितले, की जर तुम्ही लस निर्मिती करू इच्छिता तर त्यावेळी तुम्हाला सर्व कामे एकसाथ करावी लागणार आहेत. मात्र, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही झाली तर आपल्याला महामारी रोखणे कठीण होईल.