ऐतिहासिक किल्ल्यांना अजिबात धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात ज्या – ज्या ठिकाणी छत्रपतींचा, गड किल्ल्यांचा, मराठ्यांचा इतिहास आहे अशा ठिकाणी काहीही करण्यासाठी हे राज्य सरकार कधीच परवानगी देणार नाही. ऐतिहासिक किल्ल्यांना नखभरही धक्क्का लागू देणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पर्यटन मंत्रालयाने हा जो काही निर्णय घेतला आहे तो केवळ ज्या किल्ल्यांना इतिहास नाही आशा किल्ल्यांबाबचा आहे. परंतु, निर्णयाबात चुकीचे वृत्त पसरवले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गड किल्य्यासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

विरोधकांनी केला कडाडून विरोध
राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना समारंभासाठी भाडेतत्वावर दिले जाणार असल्याच्या बातमीने राज्यभरात राजकीय आणि क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले होते. या निर्णयाचा विरोधकांनीही कडाडून विरोध केला. त्यावर सरकार कडून बाजू सावरण्याचा प्रयत्न झाला. एकंदरीत या पार्श्ववभूमीवर पुण्यात गणेश मंडळांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असता त्यांनी याविषयाबात खुलासा केला.

पर्यटन विभागाच्या र्निणयावरून केवळ अफवा
मुख्यमंत्री म्हणाले, मी संभाजीराजांचे अभिनंदन करतो. त्यांनी गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठे काम केले आहे. मात्र पर्यटन मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावरून समाजात अफवा पसरवल्या जात आहेत. पण ऐतिहासिक किल्ल्यांना आम्ही नखभरही धक्क्का लागू देणार नाहीत. जेथे जेथे, छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास आहे त्या ठिकाणांना अजिबात धक्का लागू देणार नाही. जिथे केवळ चार भिंती आहेत. काही इतिहास नाही अशा ठिकाणी पर्यटन वाढवण्यासाठी काही करता येईल का असा हा निर्णय आहे. याचा असा मुळीच अर्थ नाही की, याठिकाणी लग्नसमारंभ होणार कोव इतर कार्यक्रम होणार. असे काहीही होणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –