तिकीट नाकारल्याने संतप्त भाजपा कार्यकर्त्याने चक्क नेत्याला झाडाला बांधले

पोलीसनामा ऑनलाईन : राजस्थानमधील नागौरमध्ये पंचायत राज (Panchayat raj) निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा (BJP) कार्यकर्त्याने चक्क स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून(not-giving-election-ticket-bjp-activist-tied-leader-tree0 ठेवल्याची घटना घडली आहे. बराच वेळ चाललेल्या वादविवादानंतर या नेत्याची सुटका केली. मात्र हा गोंधळ स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे भाजपावर नामुष्की ओढवली आहे.

निवडणुकीत आपल्याला तिकीट न मिळाल्यास अनेकवेळा कार्यकर्ते बंडखोरी करतात, आक्रमक होतात. आपल्याच पक्षाच्या उमेदवारात बंडाचे निशाण फडकावतात हे आपण पाहिले होते. मात्र राजस्थानमध्ये संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी चक्क मंडल अध्यक्ष आणि त्याच्या सहकार्याला चक्क झाडाला बांधून ठेवले होते. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून खडेबोल सुनावले. पंचायत राज निवडणुकीसाठी तिकीट वाटप योग्य पद्धतीने केले गेले नाही, असे नेत्यांना सांगितले. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अखेरीस काही जणांनी मध्यस्थी करत कार्यकर्ते आणि नेत्यांमधील तणाव शांत केला. त्यानंतर राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुक्तता केली.

राजस्थानमध्ये पंचायत राज संस्थांची निवडणूक होत आहे. ही निवडणूक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चार टप्प्यात होणार आहे. काल या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान या निवडणुकीत गटबाजीमुळे अनेक ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली नव्हती.