लग्नापूर्वीच ‘ही’ अभिनेत्री 2 मुलींची आई, 15 वर्षांनी लहान ‘मॉडेल’ला करतेय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या वयापेक्षा १५ वर्षांनी लहान असणाऱ्या मॉडेलला ही अभिनेत्री करतेय डेट, शिवाय लग्नाआधीच २ मुलींची आई देखील आहे. 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या सुश्मिता सेनचा आज वाढदिवस आहे. सुश्मिता सेन मागील काही काळापासून सिनेमा सृष्टीपासून लांब असली तरी तिने बॉलीवूड मधील आपल्या कारकिर्दीत अनेक हिट असे सिनेमे दिले आहेत. याच काळात सुश्मिता सेनच्या अदाकारीमुळे तिने अनेक तरुणांना आणि सिनेसृष्टीतील अनेकांना भुरळ घातली होती.

View this post on Instagram

#love 💋

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

मागील काही काळात जरी ती बॉलीवूड मध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियामध्ये ती खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते त्यातीलच सर्वात चर्चेचा विषय म्हणजे तीचे रिलेशनशिप. सध्या सुश्मिता सेन आपल्यापेक्षा १५ वर्ष लहान असणाऱ्या रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मागील काळात अनेक अभिनेत्यांचे नाव देखील सुश्मिता सोबत लावले जायचे आणि तो चर्चेचा विषय व्हायचा.

रोहमन आणि सुश्मिताची ओळख इन्स्टाग्रामवरुन झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर पुढे जाऊन प्रेमात झाले. विशेष म्हणजे रोहमन तिच्यापासून १५ वर्षांनी लहान असून तो एक मॉडेल आहे. रोहमनसोबतचे रोमँटिक फोटो सुश्मिता सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. याशिवाय हैराण करणारी बाब म्हणजे सुश्मिता सेन ही २ मुलींची आई आहे आणि तेही लग्नाआधी. सुश्मिता सेन आज 44 वर्षांची झाली आहे.

रोहमनच्या आधीही सुश्मिताचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं जात होतं. त्यात खासकरून सुश्मिता अवघ्या २० वर्षाची असताना विक्रम भट्ट सोबत तिचे नाव जोडले जायचे. शिवाय पुढील काही काळात तिचं नाव रणदीप हुड्डासोबतही जोडलं गेलं होतं. याशिवाय अजून बॉलीवूड मधील काही नावं आहेत. विक्रम भट्ट आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबतची सुश्मिताची अफेअर तर खूप गाजली मात्र यांव्यतिरिक्त संजय नारंग, शबीर भाटिया, इम्तियाज खत्री, मुदस्सर अजीज, ऋतिक भसीन, बंटी सजदेह, मानव मेनन आणि वसीम अकरम यांच्यासमवेत देखील सुश्मिता सेनचे नाव जोडले गेले होते. मात्र सुश्मिताला याबाबत विचारणा केली असता कुठलीच प्रतिक्रिया न देण्यास तिने प्राधान्य दिले.

खरेतर सुश्मिता सिंगल मदर आहे आणि तीला दोन मुली आहेत. या दोन्ही मुलींना सुश्मिताने दत्तक घेतले असून याच कारणामुळे ती खूप चर्चेत देखील आली होती. सुश्मिताच्या मुलींची नावं रेनी आणि अलिषा अशी आहेत. सुश्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत सुश्मिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असून तिने अद्यापही लग्न केलेले नाही.

काही दिवसांपूर्वी रोहमन आणि सुश्मिताचे ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं परंतु त्या फक्त अफवा होत्या असं रोहमन आणि सुश्मिताने सोशल मीडियावरून स्पष्ट केले होते. याउलट रोहमन सुश्मिताच्या कुटुंबियांसोबत किती जवळ आहे हे काही दिवसांपूर्वी सुश्मिताच्या भावाचं लग्न झालं यावेळी दिसले. लग्नाच्या प्रत्येक फॅमिली फोटोमध्ये तो सुश्मितासोबत दिसला होता याशिवाय सुश्मिताच्या दोन मुली आहेत, ज्यांना तिनं दत्तक घेतलं आहे. या दोघांशीही रोहमन खूप स्पेशल बॉन्डिंग शेअर करताना दिसतो. यावरून दिसते की, दोन्ही खूप जवळ असून लवकरच विवाहबद्ध होतील असे दिसतेय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like