एकनाथ खडसे अन् राजु शेट्टींना नको तर यांना करा आमदार, सदाभाऊ खोतांनी राज्यपालांकडे दिली यादी

पोलिसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त आमदार कोणाला करायचं यावरून अजूनही गोंधळलेले वातावरण आहे. महाविकासआघाडीतील पक्षांनी सादर केलेल्या यादीला राज्यपाल भगतसिंग कोशारी मान्यता देतील की नाही याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वाभिमानचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नावाला विरोध होईल असे सांगितलं जात आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी एक बारा नावांची वेगळी यादी सादर केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निकषात योग्यपणे बसणारे हे लोक आहेत, अशा लोकांची निवड करा असे आवाहनही त्यांनी केलं आहे. एक प्रकारे सदाभाऊंनी खडसे, शेट्टी राहू दे त्या लोकांना आमदार कराच अशी भूमिका घेतील आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सादर केलेल्या यादीत यांची आहेत नावे…

सामाजिक कार्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे, लेखक विठ्ठल भाग, विश्वास पाटील, क्रिकेटपटू जहीर खान, तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, सामाजिक कार्यासाठी अमर हबीब, प्रबोधन निवृत्ती महाराज इंदुरीकर, पोपटराव पवार, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज आणि बुधाजीराव मुळीक यांचा समावेश आहे. या लोकांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलं आहे. हे लोक काम करतात ते समाजाला पुढे नेत आहेत. त्यांना आजवर कुठेही संधी मिळालेली नाही. राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांच्या कार्याचा सन्मान करत शिवाय धोरण ठरविणाऱ्या मोठ्या सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांच्या विचारांचा उपयोग करून घ्याव, असं आवाहन खोत यांनी यावेळी केलं आहे.