मासिक पाळीत स्वच्छता राखा ; दुर्लक्ष केल्यास ‘या’ आजारांचा धोका

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अजूनही अनेक गावांमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या दिवसांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत अनेक महिलांना काहीच माहीत नसते. विशेष म्हणजे शहरांमध्येही अशा महिला आढळतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर साफ-सफाई आणि स्वच्छतेकडे दुर्लक्षे केले तर शरीराच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका वाढतो.

मासिक पाळीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास ‘स्किन इरिटेशन’ होऊ शकते. ज्यामुळे त्वचारोग होऊ शकतात. या आजारात त्वचेला सूजही येते. त्वचा लाल होते आणि अनेकदा पिंपल्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर यूरेथ्रामध्ये बॅक्टेरियाचा प्रवेश झाला तर ‘यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श’न म्हणजेच यूटीआयचा धोका वाढतो. हा अत्यंत गंभीर आजार आहे. यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर यामुळे किडनीही डॅमेज होऊ शकते. अस्वच्छतेमुळे हानिकारक बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि जेनिटल ट्रॅक्टच्या भागामध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि यामुळे योनीला नुकसान होऊ शकते.

यूटीआय आणि रिप्रॉडक्टिव ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या कारणामुळे गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सरचा धोका वाढतो. हा युटेरसमध्ये असणाऱ्या सर्विक्सचा कॅन्सर असतो. जो एचपीवी वायरसमुळे होतो. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास महिलांमध्ये वंधत्वाचा धोकाही निर्माण होतो.

You might also like