इतक्‍यात लग्न नाही : राजकुमार राव

गुडगावमधून आलेला एक सामान्य मुलाने आज अनेक मुलींच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. राजकुमार राव न्यूटन चित्रपासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सध्या “ओमेर्ता’ चित्रपटातून दहशतवाद्याची भूमिका साकारतो आहे. त्यामुळे राजकुमार कामांमध्ये बराच व्यग्र आहे. त्याला सतत लग्नाविषयी विचारणा होते.

राजकुमाराची गर्लफ्रेंड पत्रलेखा मध्यंतरी बरेच चर्चेत होते. अशी चर्चा असली तरी ते दोघे त्यांच्या नात्याबद्दल अजिबात बोलत नाहीत. यावर राजकुमार म्हणाला, “आम्ही लग्नाबाबत बोलत नाही याचा अर्थ असा नाही की, आम्ही लग्न करणार नाही किंवा लग्नसंस्थेवर विश्‍वास ठेवत नाही. माझ्या लग्नाला अजून बराच वेळ आहे. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पत्रलेखाने मला साथ दिली आहे. एका जोडीदाराच्या रूपात तिने मला प्रत्येकवेळी साथ दिली आहे. मला ती नेहमीच चांगला पाठिंबा देते.”