अंकिताच नव्हे तर TV इंडस्ट्रीतील ‘या’ 4 प्रसिद्ध अदाकारांसोबत होती सुशांतची जबरदस्त बाँडिंग !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपनंतर चाहते खूपच निराश झाले. टीव्ही इंडस्ट्रीत अंकिताव्यतिरीक्त आणखी काही अदाकारा अशा होत्या ज्यांची सुशांतसोबत खास बाँडिंग होती.

1) आरती सिंह – आरती सिंह आणि सुशांत सिंह राजपूत एकमेकांचे चांगले मित्र होते. आरती आणि कृष्णाला भेटायला सुशांत अनेकदा त्यांच्या घरी जात असे. आरतीदेखील त्याला खूप मानत होती. सुशांतच्या निधनानं तिला खूप दु:ख झालं होतं.

2) मौनी रॉय – सुशांतच्या बेस्ट फ्रेंडच्या यादीत मौनी रॉयचंही नाव आहे. मौनी सुशांत आणि अंकिताच्या घरी पार्टी करण्यासाठी कायम येत असे. मौनी अंकिता आणि सुशांत दोघांचीही चांगली मैत्रीण होती.

3) रश्मी देसाई – रश्मी अंकिताला दीर्घकाळापासून ओळखत होती. सुशांतसोबतही तिची खास बाँडिंग होती. सुशांतच्या जाण्यानं तिला मोठा धक्का बसला होता.

4) क्रिस्टल डिसूजा – सुशांत आणि क्रिस्टलची वेगळीच बाँडिंग होती. सुशांत क्रिस्टलला बहिण मानत असे. सुशांतच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणारी क्रिस्टल टीव्ही इंडस्ट्रीतील एकमेव अॅक्ट्रेस होती.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.