केवळ चिदंबरमच नव्हे तर ‘या’ 6 काँग्रेसी नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे ‘गंभीर’आरोप

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मनमोहन सिंग सरकारच्या काळात गृहमंत्री तसेच अर्थमंत्री राहिलेल्या चिदंबरम यांच्या अटकेनंतर आता इतर काँग्रेस नेत्यांवरही दाखल झालेली प्रकरणे चर्चेत आली आहेत. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल आहेत त्या सर्वांविरोधात कारवाई झाली तर काँग्रेस पक्षात मोठे नेतेच शिल्लक राहणार नाहीत.

काँग्रेस मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले चिदंबरम हे काही एकटेच नेते नाहीत. पक्षात वरून खालपर्यंत अनेक नेत्यांविरोधात गंभीर मामले चालू आहेत. यापेक्षा पुढचं म्हणजे पक्ष चालवणाऱ्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी सुद्धा जमानतीवर बाहेर आहेत. अनेकवेळा प्रधानमंत्री मोदी आपल्या भाषणांमध्ये यावर व्यंग सुद्धा करतात. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या बजेट सत्रादरम्यान काँग्रेस नेता अधीर रंजन म्हणाले होते कि, जर भ्रष्टाचाराची प्रकरणे असतील तर मग अटक का करत नाहीत. त्यावर प्रधानमंत्री मोदी यांनी हसत म्हणाले, जमानतीवर आहेत तर आनंद घेऊ देत.

एकंदरीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर नजर टाकल्यास दिल्ली ते हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ते महाराष्ट्रातील मोठे कॉंग्रेस नेते सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. इतर नेत्यांवर हि कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे नेते गप्प आहेत. तरी काँग्रेस हे आरोप फेटाळून लावत आहेत. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत आहे त्यांचे म्हणणे आहे.

नेशनल हेराल्ड केस-२०११, मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे आहेत. काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्ड, नवजीवन आणि कौमी आवाज, यांना ९० कोटींचे कर्ज दिले होते. यानंतर यंग इंडियन कंपनीची ५ लाख रुपयांमध्ये स्थापना झाली. त्यामध्ये सोनिया आणि राहुल यांचा ३८-३८ टक्के हिस्सा आहे. तसेच हेलिकॉप्टर घोटाळा, ज्यामध्ये अगस्ता वेस्टलँड व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा उघडकीस आला.

सीबीआयसह केंद्रीय संस्था कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्या राजकीय सचिवांवर इटालियन चॉपर कंपनी अगस्ता वेस्टलँडकडून कमिशन घेतल्याच्या आरोपाची चौकशी सुरु आहे. रुग्णवाहिका घोटाळा ज्यामध्ये गेहलोत आणि पायलट अडकलेले आहेत.

डीके शिवकुमार, वीरभद्र सिंह यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगण्याचा आरोप आहे. हरीश रावत, यांच्यावर २००१६ च्या सुमारास संसदेच्या आवारात खासदारांना लाच देण्याचा आरोप आहे. भूपिंदर सिंह हुड्डा, यांच्यावर गुरुग्राम येथे जमीन प्रकरणात चौकशी चालू आहे.

जगदीश टाइटलर यांच्यावर आरोप आहे कि, सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा वापर करून फसवणूक, गुन्हेगारी षडयंत्र यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चालू असलेल्या खटल्यात टायटलर आणि वर्मा यांच्यावर आरोप निश्चित केले गेले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –