#YogaDay 2019 : योगामध्ये ‘करियर’, कमवू शकता ‘इतके’ रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगा हा भारतीयांचा अविष्कार फक्त भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध झाला आहे. भारतापेक्षा जास्त जगभर योगाला मानणारे नागरिक आपल्याला दिसून येतात. फक्त व्यायाम प्रकार म्हणून याकडे न पाहता करियरचा पर्याय म्हणून देखील तुम्ही याकडे पाहू शकता. यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. योगगुरू बनून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. मागील काही वर्षांत वैयक्तिक योग शिक्षक आणि मोठ्या कंपन्यांमध्ये देखील योगा ट्रेनरची मागणी वाढली आहे.

अमेरिकेत सर्वात जास्त गुंतवणूक

अमेरिकेत जवळपास ७५ टक्के महिला आपल्याला योगा करताना दिसून येतात. ताईच अमेरिकेत एकूण ६००० योगा स्टुडिओ आहेत. योगासंबंधी वस्तू, कपडे तसेच साधनांवर अमेरिकन वर्षाला १६ बिलियन डॉलर खर्च करत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. योग शिक्षक बनण्यासाठी तुम्ही एक उत्तम वक्ते असायला हवेत. एका व्यक्तीपासून ते हजारोंच्या समुदायाला तुम्हाला संबोधित करता यायला हवे. त्याचबरोबर मातृभाषेबरोबर तुम्हाला इंग्रजी उत्तम बोलता यायला हवी. त्याचबरोबर एखादी विदेशी भाषा तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. यासाठी तुम्हाला एका चांगल्या संस्थेतून योगाचे प्रशिक्षण घ्यायला हवे.

या क्षेत्रात करू शकता योगा करियर

१) संशोधन क्षेत्रात तुम्ही योगविषयक करियर करू शकता
२) हेल्थ रिसॉर्ट आणि इंटरनॅशनल फाइव स्टार हॉटेल मध्ये तुम्ही योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता.
३) त्याचबरोबर जिम, शाळा,कॉलेजमधेय तुम्ही योगा शिक्षक म्हणून काम करू शकता.
४) टेलिव्हिजन चॅनेलवर देखील तुम्ही योगाविषयक काम करू शकता

इतकी होईल कमाई

योगविषयक नोकरी आणि करियर करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. मोठ्या कंपन्यांमध्ये सेवा देऊन तुम्ही सर्वात जास्त पैसे मिळवू शकता.

आरोग्याविषयक वृत्त

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

मीठ शरीरारासाठी वाईट, असे म्हणतात; जाणून घ्या सत्य

चिंता, दु:ख, मानसिक तणावामुळे वाढतात पोटाचे विकार

मलावरोध ही समस्या अनेक गंभीर आजारांचे उगमस्थान

सिने जगत

‘आर्टिकल 15’ चित्रपटाबद्दल आयुष्मान खुरानाचा ‘मोठा’ खुलासा

ये ‘परश्या’ तुझी ‘आर्ची’ लगीन करतीया लगीन !