अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाची भेट फक्त इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे देखील घ्यायचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला होता की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट घेतली होती, यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान त्यांच्याकडे अनेक बोटं उठल्याने राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे. मात्र करीम लालाचे नातू सलीम खान यांनी धक्कादायक खुलासा केला की करीम लालाची भेट फक्त इंदिरा गांधीच नाही तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही घेतल्याचा दावा केला आहे.

संजय राऊतांच्या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर सलीम खान यांनी हा खुलासा केला आहे. संजय राऊत म्हणाले होते की अनेक नेते करीम लालांची भेट घेत होते त्यापैकी एक इंदिरा गांधी देखील होत्या. यावर सलीम खान म्हणाले की, फक्त इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या करीम लालांशी भेटी गाठी व्हायच्या.

सलीम खान म्हणाले की करीम लाला यांना भेटायला इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या हे चुकीचे आहे. मात्र करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट ही दिल्लीत झाली आहे आणि याबाबतचे फोटो देखील आहेत. तसेच ते म्हणाले करीम लाला हे पठाणांचे नेते होते. पठाण समुदायाला अडचणी आल्यास त्या अडचणी नेत्यांसमोर मांडून त्यांचे निरसन ते करायचे. या कारणामुळे त्यांच्या अनेक नेत्यांशी भेटी गाठी व्हायच्या.

दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. त्यावर सलीम खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सलीम खान म्हणाले की, करीम लाला हे एक व्यापारी होते. त्यांना राजकारणात जावं असं कधीही वाटलं नाही. पठाण समुदायाप्रती त्यांना प्रचंड आदर असल्याने ते त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहायचे. तसेच त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते की, ते राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरवू शकतील. असा देखील खुलासा त्यांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/